शनिवारी हौसिंग दरबारचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:15 IST2020-12-31T04:15:58+5:302020-12-31T04:15:58+5:30

नाशिक शहर व जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत व विविध तक्रारीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शनिवार दि.२ जानेवारी ...

Housing court held on Saturday | शनिवारी हौसिंग दरबारचे आयोजन

शनिवारी हौसिंग दरबारचे आयोजन

नाशिक शहर व जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत व विविध तक्रारीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शनिवार दि.२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता हौसिंग दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे, असे नाशिक तालुका सहकारी संस्थेचे उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी कळविले आहे.

शहरातील तिडके कॉलनी येथील बाजीरावनगर येथे जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था कार्यालय सभागृह येथे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. १ ते १५ जानेवारी या कालावधीत सहकार खात्यामार्फत मानवी अभिहस्तांतरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश संबंधीत सहकारी गृहनिर्माण संस्थांना विकासकाडून जमिनीचे कायदेशीर हक्क व मालकी प्रदान करणे हा आहे. यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमन किंवा सचिव व सभासद, प्रतिनिधी यांनी मानवी अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेत सहभाग घेऊन चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी हौसिंग दरबारास मोठ्या संख्येने हजर रहाण्याचे आवाहन उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक तालुका फयाज मुलाणी यांनी केले आहे.

Web Title: Housing court held on Saturday