शासकीय निवासस्थानाच्या घरभाडे भत्त्यात अनियमितता
By Admin | Updated: January 28, 2015 02:04 IST2015-01-28T02:04:28+5:302015-01-28T02:04:55+5:30
माजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

शासकीय निवासस्थानाच्या घरभाडे भत्त्यात अनियमितता
नाशिक : जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धनंजय काटकर यांनी त्यांच्या कार्यकाळात शासकीय निवासस्थान घेतल्यानंतरही घरभाडे घेऊन अनियमितता केल्याची तक्रार जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे राजेंद्र नानकर यांनी केली आहे. जून २००६ ते आॅक्टोबर २००७ या काळात जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असताना, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धनंजय काटकर यांनी घरभाडे भत्ता घेऊन नंतर अनियमितता झाकण्यासाठी २० हजार ५७५ रुपये व २३ हजार ८४८ रुपये असा एकूण ४४ हजार ४२३ जिल्हा कोषागार कार्यालयात नोव्हेंबर व डिसेंबर २००७ रोजी भरणा केला आहे. त्यांनी या रकमेचा अपहार केल्याचा आरोप राजेंद्र नानकर यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीला दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. (प्रतिनिधी)