डाळींचे भाव वाढल्याने गृहिणींचे नियोजन कोलमडले
By Admin | Updated: July 24, 2016 22:49 IST2016-07-24T22:43:10+5:302016-07-24T22:49:19+5:30
डाळींचे भाव वाढल्याने गृहिणींचे नियोजन कोलमडले

डाळींचे भाव वाढल्याने गृहिणींचे नियोजन कोलमडले
खामखेडा : दैनंदिन जीवनात आहारात प्रथिने पुरविण्याच्या दृष्टीने डाळींना विशेष महत्त्व आहे. परंतु उत्पादन घटल्याने आता डाळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत.
पावसाचे प्रमाणही कमी-कमी होत गेल्याने जिरायती शेती बागायती आणि खरीप पिकांच्या जागी भाजीपालावर्गीय पिके घेतली जाऊ लागल्याने शेतकरी खरीप हंगामात भुईमग, बाजरीऐवजी मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेऊ लागल्याने मका पिकात मठ, मूग, चवळी, उडीद ही कडधान्ये आंतरपीक घेता येत नसल्याने कडधान्य उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांना दुकानातूनच डाळी खरेदी कराव्या लागत आहेत, त्यांची अजुनही अमलबजावणी नाही. तूरडाळीच्या भावात वाढ झाल्याने गरिबाला तुरीच्या वरणापासून मुकावे लागत आहे. सध्या तूरडाळीच्या भावात अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दैनंदिन जेवणातील वरण-भाताला मुकावे लागत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर अखेर राज्यस्थानी तूर, मठ, मूग, तूर आदि बाजारात दाखल होते. डाळप्रक्रि या उत्पादन करणारे व्यापारी या राज्यातून माल आयात करतात त्यामुळे डाळी प्रक्रियावरील खर्च वाढतो. त्यामुळे डाळींच्या भावात वाढ झाली असल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)