शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीच्या खुल्या जागांवर भाडोत्रींचा कब्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:49 IST

शहरातील अनेक भागात गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी बांधताना सोडण्यात आलेल्या खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर त्या विविध संस्थांना वाटण्यात आल्या. सर्वाेच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशा खुल्या जागा या त्या भागातील नागरिकांच्या उपयोगासाठीच असताना त्यावर मात्र अनेक खासगी संस्था कब्जा करून बसल्या असून, त्यामुळे आता महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी वाद : भाडे आकारणीमुळे महापालिकाच अडचणीत

नाशिक : शहरातील अनेक भागात गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी बांधताना सोडण्यात आलेल्या खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर त्या विविध संस्थांना वाटण्यात आल्या. सर्वाेच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशा खुल्या जागा या त्या भागातील नागरिकांच्या उपयोगासाठीच असताना त्यावर मात्र अनेक खासगी संस्था कब्जा करून बसल्या असून, त्यामुळे आता महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे.नगररचना अधिनियमानुसार सोसायटी बांधताना अभिन्यासाच्या वेळी जागा सोडावी लागते तर काही वेळा सोसायटी अंतर्गतच जागा सोडली जाते. सामान्यत: लेआऊट किंवा अभिन्यास मंजुरीसाठी महापालिकेकडे सादर केल्यानंतर त्यातील दहा टक्के जागा मोकळी सोडावी लागते. परंतु अशाप्रकारची जागा सोडल्यानंतर ती महापालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी दिली जाते. त्यानंतर त्यावर महापालिका नियमानुसार दहा टक्के बांधकाम अनुज्ञेय असल्याने नगरसेवकांच्या मागणीनुसार केले जाते आणि मग एखाद्या ठिकाणी समाजमंदिर, अभ्यासिका, वाचनालय, व्यायामशाळा असे काहीही बांधल्यानंतर एखाद्या मंडळ किंवा संस्थेस चालविण्यासाठी दिले जाते. काही संस्था सामाजिक बांधिलकीतून त्याचा वापर करतात. परंतु अनेक संस्था या व्यावसायिक कारणासाठी वापर करतात.राजकीय निर्णय, त्रास मात्र महापालिकेला..महापालिकेत यापूर्वी अनेक मोकळे भूखंड क्रीडा संस्थांना देण्याचे वाद गाजले आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी दोन नगरसेवक किंवा आजी माजी नगरसेवकांच्या वादातही नागरिक भरडले गेले आहेत. तथापि, स्थानिक नागरिकांना न विचारताच महासभेत केवळ अशासकीय ठरावाव्दारे जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला जातो. त्यात आयुक्तांचे कायदेशीर अधिकारदेखील तपासले जात नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, अशाप्रकारच्या मिळकती भाड्याने दिल्यानंतर वाद निर्माण झाले तर त्याचा त्रास मात्र प्रशासनाला होतो.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMONEYपैसा