एकलहरे येथील दोन शेतमजुरांची घरे जळून खाक
By Admin | Updated: April 30, 2015 23:34 IST2015-04-30T23:34:22+5:302015-04-30T23:34:22+5:30
एकलहरे येथील दोन शेतमजुरांची घरे जळून खाक

एकलहरे येथील दोन शेतमजुरांची घरे जळून खाक
कळवण : येथून जवळच असलेल्या एकलहरे येथील दोन शेतमजुरांच्या घराला दुपारी लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या. शेतमजूर बापू हिरामण माळी, सयाजी हिरामण माळी यांचे एक लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
एकलहरे गावात बापू माळी व सयाजी माळी यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच विष्णू बोरसे, प्रवीण बोरसे, भिका बोरसे, प्रवीण गांगुर्डे, मनोहर बोरसे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र यामध्ये यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू, बाजरी, गहू, तांदूळ आदि जळून खाक झाले. त्याशिवाय घरात एका डब्यातील बापू माळी यांची चार हजार रुपये, तर सयाजी माळी यांचे सहा हजार रु पये जळून खाक झाले आहे, तसेच शाळेचे कागदपत्र, रेशनकार्ड असे एकूण दोन्ही शेतमजुराचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेतमजुरांचा संसार उघड्यावर आला आहे. नुकसानग्रस्त शेतमजुरांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. यावेळी तलाठी हिरे व ग्रामसेवक घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला . ( वार्ताहर)