हरितालिकेनिमित्त पांडाणे परिसरात घरोघरी पूजा
By Admin | Updated: September 5, 2016 00:44 IST2016-09-05T00:43:36+5:302016-09-05T00:44:33+5:30
हरितालिकेनिमित्त पांडाणे परिसरात घरोघरी पूजा

हरितालिकेनिमित्त पांडाणे परिसरात घरोघरी पूजा
पांडाणे : संपूर्ण महाराष्ट्रात हरितालिका व्रत मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत असते. हे व्रत सौभाग्यवती महिला आपले सौभाग्य अबाधित राहावे यासाठी करतात. हे व्रत पार्वतीने शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी केले. पार्वतीने कुमारिका असताना
बारा वर्षे झाडाची पाने व कंदमुळे खाऊन हिमालयात तप केले व त्या पुण्याईमुळे तिला शंकर प्राप्त झाले .
देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे व्रतांमध्ये हरितालिका व्रत श्रेष्ठ मानले
जाते. हे व्रत करताना ज्या ठिकाणी शेण व गोमूत्राने जागा सारवून त्याठिकाणी तोरण बांधून केळीचे खांब बांधून ते स्थळ सुशोभित करावे व त्या चौरंगावर महादेवाचे लिंग पार्वतीसह स्थापन करावे. त्याचे पूजन करून मनोभावे प्रार्थना करावी.
या व्रतामुळे प्राणी पापापासून मुक्त होतो. स्त्रियांचे सौभाग्य वाढते.
हरितालिका पूजन हे गणपती बसणाच्या एक दिवसाच्या पूर्वसंध्येला केले जाते. हरितालिकेचे व्रत दिंडोरी तालुक्यातील वणी येथील कृष्णमंदिरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. (वार्ताहर)