घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:28 PM2020-02-25T22:28:46+5:302020-02-26T00:15:02+5:30

द्याने येथील आंबेडकरनगरातील प्रशिक चौकात धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सुमारे ४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला.

The house was lumped in at Rs 1.5 lakh | घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास

घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्देद्याने येथील घटना : रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल

मालेगाव : शहरानजीकच्या द्याने येथील आंबेडकरनगरातील प्रशिक चौकात धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सुमारे ४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी घरमालक विशाल सुनील मेतकर यांनी रमजानपुरा पोलिसांत फिर्याद दिली. शुक्रवारी रात्री साडेअकरा ते शनिवारी सकाळी दहा वाजेदरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी फिर्यादीच्या बंद घरात प्रवेश करुन घरातील पहिल्या मजल्यावरील लोखंडी कपाट उघडून ७८ ग्रॅम वजनाचे २ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, २ लाख रुपयांची रोकड, ३ हजारांची दहाभार चांदी, ३ हजारांचा भ्रमणध्वनीसंच असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. रमजानपुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.

Web Title: The house was lumped in at Rs 1.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.