घरफोडीत कारही लंपास
By Admin | Updated: December 25, 2015 00:21 IST2015-12-25T00:14:15+5:302015-12-25T00:21:36+5:30
घरफोडीत कारही लंपास

घरफोडीत कारही लंपास
नाशिक : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी गृहोपयोगी साहित्यास घराबाहेर उभी केलेली कारही चोरून नेल्याची अजब घटना वडाळा शिवारात घडली आहे़ शिवाई बंगल्यामध्ये राहणारे रमेश गोविंदराव भोईटे (६६) हे बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरातील गॅस शेगडी, अॅक्वागार्ड, मिक्सर यांसह घराबाहेर उभी असलेली सॅन्ट्रो कार (एमएच १५, बीएन १८४) चोरून नेली़