हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट म्होरक्याला अटक

By Admin | Updated: March 17, 2017 01:17 IST2017-03-17T01:17:13+5:302017-03-17T01:17:37+5:30

पोलीस कोठडी : मुंबईलाही खोटी गुंतवणूक कंपनी केली ‘लॉन्च’

The house of investment leader was arrested | हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट म्होरक्याला अटक

हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट म्होरक्याला अटक

नाशिक : कोट्यवधी रुपयांना गंडविणाऱ्या हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटचा म्होरक्या विनोद पाटील मागील सहा ते सात महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईच्या खेरवाडी परिसरात जाऊन पाटीलच्या मुसक्या बुधवारी (दि.१५) आवळल्या. न्यायालयाने पाटील यास येत्या गुरुवारपर्यंत (दि. २३) पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट या कंपनीचा संचालक संशयित आरोपी विनोद पाटील याने सुमारे चार वर्षांपूर्वी हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंटची स्थापना केली होती. तीस एजंट्समार्फत शेकडो गुंतवणूकदारांकडून ५०हजारांपासून एक कोटी रु पयांपर्यंतच्या रकमेची गुंतवणूक करत फसवणूक केली. पाटील याने गुंतवणूकदारांची रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतविली होती. पाच ते सहा महिन्यांपूर्वी पाटील याने व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मागण्यास सुरु वात केली होती. फसवणुकीचा आकडा जवळपास सुमारे साडेपाच कोटींच्या घरात असल्याचे समजते.

Web Title: The house of investment leader was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.