मनपाकडूनच लाभार्थ्यांना घरकुल वाटप
By Admin | Updated: January 11, 2017 00:37 IST2017-01-11T00:37:29+5:302017-01-11T00:37:49+5:30
भगवान भोगे : जाधव यांनीच बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप

मनपाकडूनच लाभार्थ्यांना घरकुल वाटप
नाशिक : महापालिकेने पंचवटीतील मजुरांना घरकुलांचे वाटप करताना लाभार्थी चुकीच्या पद्धतीने नोंदवल्याची तक्रार महापालिकेत केली होती. मात्र, त्यात कोणतेही तथ्य न आढळल्याने मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनीच संबंधिताना घरकुलांचे वाटप केले. आपण नगरसेवक असताना कोणत्याही प्रकारे घरकुलांचे वाटप केलेले नाही, असा दावा पंचवटीतील शिवसेना नगरसेवक भगवान भोगे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर नगरसेवक समाधान जाधव यांनी अनधिकृत बांधकाम केल्याने महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरण्याची त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, त्याकडे त्यांनी लक्ष पुरावावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मजूरवाडीतील घरकुलांच्या वाटपात घोटाळा झाल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नगरसेवक समाधान जाधव यांनी केली असून, त्यासंदर्भात त्यांनी माजी नगरसेवक भगवान भोगे आणि रिमा भोगे यांच्यावर आरोप केले आहे.