घरफोडीत ७२ हजारांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: November 12, 2016 01:51 IST2016-11-12T01:37:10+5:302016-11-12T01:51:43+5:30
घरफोडीत ७२ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडीत ७२ हजारांचा ऐवज लंपास
नाशिक : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी पाऊण लाखाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना अंबडमधील माणिकनगरमध्ये घडली आहे़ जितेंद्र सोमनाथ जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ मे २०१६ रोजी ते कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)