घरफोड्यास अटक
By Admin | Updated: June 23, 2017 16:45 IST2017-06-23T16:45:26+5:302017-06-23T16:45:26+5:30
डिसूझा कॉलनीत घरफोडी करून गृहोपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या गंगापूर गावातील घरफोड्यास पोलिसांनी अटक केली आहे़

घरफोड्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : डिसूझा कॉलनीत घरफोडी करून गृहोपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या गंगापूर गावातील घरफोड्यास पोलिसांनी अटक केली आहे़ महेश बळीराम शिरसाठ (२२ रा. गोवर्धन गंगापूर गाव) असे या संशयिताचे नाव असून, त्याचा साथीदार दीपक खैरनार (रा. प्रबुद्धनगर, सिडको) हा फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसूझा कॉलनीतील धनलक्ष्मी सोसायटीतील रहिवासी जयदीप दौलतराव निकम हे ३० मे २०१७ रोजी बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील फिलीप्स कंपनीचा टीव्ही, रिमोट आणि चादर असा सुमारे २० हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी शिरसाठ यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली असून, आपल्या साथीदारांची नावेही सांगितली आहेत़ त्याच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत़