शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई नाका-वडाळा रस्त्यावर तासभर कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:13 IST

भाभानगरमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये एका कार्यक्रमासाठी गर्दी उसळल्याने सभागृहामागील मुंबईनाका-वडाळा रस्त्याला जोडणाऱ्या अरुंद रस्त्यावर तासभर वाहतूक कोंडी झाली.

नाशिक : भाभानगरमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये एका कार्यक्रमासाठी गर्दी उसळल्याने सभागृहामागील मुंबईनाका-वडाळा रस्त्याला जोडणाऱ्या अरुंद रस्त्यावर तासभर वाहतूक कोंडी झाली.  मुंबईनाका-वडाळा रस्त्याला नंदिनी नदीकाठापासून जोडणारा अरुंद रस्ता गायकवाड सभागृहामागून जातो. या रस्त्याच्या एका बाजूला नदीचा काठ असून दुसºया बाजूला रहिवासी अपार्टमेंट आहे. अगदी पंधरा ते तीस फुटांचा हा रस्ता अंतर्गत रहदारीसाठी तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानकपणे कार्यक्रम आटोपून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी पालकांची गर्दी उसळली. यामुळे रस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांची कोंडी झाली. या रस्त्यावरून मुंबईनाका-वडाळारोडच्या दिशेने ये-जा करणारे वाहनचालक समोरासमोर आले होते.  सभागृहाशेजारील वाहनतळातून अचानकपणे मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनधारक आपली लेन सोडून विरुद्ध बाजूच्या लेनवर जाण्याच्या प्रयत्नाने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.वडाळा रस्त्यावरही कोंडीया रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा ताण वडाळा-इंदिरानगर मुख्य रस्त्यावरही पडला. वाहनांच्या रांगा थेट वडाळा रस्त्यापर्यंत लागल्याने वडाळा रस्त्यावर भारतनगरपासून विनयनगरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. तर दुसरीकडे हिरवेनगरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र होते. एकूणच संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा या वाहनकोंडीमुळे फज्जा उडाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसNashikनाशिक