नाशिक : शहारामधील गंगापूरररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड या भागात रेस्टॉरंटच्या परिसरात चोरट्यांनी वक्रदृष्टी केली आहे. वाहनतळातील मोटारींमधून मौल्यवान वस्तू गायब होण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. आनंदवली शिवारातील अशाच एका प्रसिध्द रेस्टॉरंटमध्ये भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी गेल्या ग्राहकांना हे भोजन चांगलेच महागात पडले. ८५ हजारांची रोकड व २५ हजारांचे दागिन्यांवर त्याला पाणी सोडावे लागले.याबाबत गंगापूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी, जसपालिसंग देव(रा. नाशिकरोड) हे भोजनासाठी रेस्टॉरंटमध्ये थांबले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतून ८५ हजाराची रोकड व २५ हजारांचे दागिणे हातोहात लंपास केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ५ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी दहा हजाराच्या दोन अंगठ्या, १९००रु पयांच्या चांदीच्या आठ अंगठ्या असा १ लाख ७हजार रु पयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगमधून चोरून नेला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उगले पुढील तपास करीत आहेत.
हॉटेलचे जेवण पडले महागात; ८५ हजारांची रोकड, दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:25 IST
नाशिक : शहारामधील गंगापूरररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड या भागात रेस्टॉरंटच्या परिसरात चोरट्यांनी वक्रदृष्टी केली आहे. वाहनतळातील मोटारींमधून मौल्यवान वस्तू गायब ...
हॉटेलचे जेवण पडले महागात; ८५ हजारांची रोकड, दागिने लंपास
ठळक मुद्दे१ लाख ७हजार रु पयांचा मुद्देमाल चोरट्याने बॅगमधून चोरून नेला. दहा हजाराच्या दोन , १९००रुपयांच्या आठ अंगठ्या गायब