हॉटेल्स गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:11 IST2020-12-09T04:11:44+5:302020-12-09T04:11:44+5:30

रचना विद्यालयात महापरिनिर्वाण दिन नाशिक : महाराष्ट्र समाज सेवा संचलित रचना विद्यालयाच्या प्राथमिक विभागात महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन ...

Hotels are bustling | हॉटेल्स गजबजले

हॉटेल्स गजबजले

रचना विद्यालयात महापरिनिर्वाण दिन

नाशिक : महाराष्ट्र समाज सेवा संचलित रचना विद्यालयाच्या प्राथमिक विभागात महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक माया आचार्य, निशा बर्वे, मनीषा येवला, यशवंत मोरे, सुनील गांगुर्डे, भारती पाटील उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील ध्वनिफीत यावेळी दाखविण्यात आली.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता

नााशिक : गाडगे महाराज धर्मशाळा येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद भद्रकाली पोलिसांत दाखल झाली आहे. गेल्या ३ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रंग गोरा, उंची पाच फूट दोन इंच, चेहरा उभट, नाक सरळ, कपाळावर उजव्या बाजूस जखमेची खूण अशा वर्णनाची मुलगी कुणाला आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी नावनोंदणी मोहीम

नाशिक : शासनाने कोरोनाच्या काळात काम केलेल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र समविचारी मंच या संस्थेच्या वतीने आंदोलनाची तयारी केली जात असून, त्यासाठी कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब ढोले, ॲड. नीलेश आखाडे, डॉ. कैलास गवळी यांनी केले आहे.

Web Title: Hotels are bustling