अपघातात हॉटेल व्यावसायिक ठार
By Admin | Updated: March 29, 2015 00:22 IST2015-03-29T00:22:46+5:302015-03-29T00:22:54+5:30
अपघातात हॉटेल व्यावसायिक ठार

अपघातात हॉटेल व्यावसायिक ठार
दिंडोरी : तळेगावजवळील एका वळणावर गाडी उलटून झालेल्या अपघातात लखमापूर फाटा येथील हॉटेल व्यावसायिक ठार झाले आहे. शुक्र वारी रात्री लखमापूर फाटा येथील हॉटेल गुरु दत्तचे मालक यशवंत संपतराव जाधव (३९) हे त्यांच्या (एमएच १५ सीएस २१२१) या सफारी वाहनाने नाशिकहून दिंडोरीकडे येत असताना तळेगाव जवळच्या एका वळणावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी पलटी झाली. त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी नाशिकला खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)