शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

रुग्णालयांनी दोन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 01:26 IST

वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यात  सुयोग्य नियोजनातून हळूहळू सुधारणा होत असून, जोपर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत रुग्णालयांनी ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक करावा. तसेच किमान दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा आपल्या रुग्णालयात ठेवावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 

ठळक मुद्देपालकमंत्री भुजबळ : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

नाशिक :  वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यात  सुयोग्य नियोजनातून हळूहळू सुधारणा होत असून, जोपर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत रुग्णालयांनी ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक करावा. तसेच किमान दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा आपल्या रुग्णालयात ठेवावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड सद्य:स्थिती, उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. बापूसाहेब नागरगोजे, भागवत डोईफोडे, गणेश मिसाळ, वासंती माळी, डॉ. अनंत पवार, माधुरी पवार, किरण जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्हा नियोजनातून मंजूर करण्यात आलेले ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. ऑक्सिजनच्या कामकाजासाठी नियमित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच आवश्यक त्या ठिकाणी ड्युरा सिलिंडरची व्यवस्था करण्यात यावी. मोठ्या रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था निर्माण करण्यात यावी. औषधांचा साठा मुबलक प्रमाणात आहे की नाही याची नियमित तपासणी करण्यात यावी,  जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांनी आपल्याला आवश्यक असलेल्या औषध, ऑक्सिजन याबाबत नियमित अहवाल देऊन आपली मागणी कळवावी, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. 

लॉकडाऊनचा परिणाम चांगला झाला असून, आपण त्या माध्यमातून सुमारे दोन हजारांनी रुग्णसंख्या कमी करू शकलो आहोत. जिल्हाभरात यापुढील काळातही लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक असल्यास स्थानिक बाजारपेठा बंद ठेवण्यात याव्यात. लॉकडाऊन यशस्वी करण्यात पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, पोलिसांनी काटेकोर नियोजन करावे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचे कडक पालन करण्यात यावे. लसीकरणाबाबत जिल्हाभरात नियोजन करण्यात यावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले .

इन्फो ...व्यवस्था शासकीय खर्चातून करावी

कोरोनाबाधित रुग्ण व त्याबरोबर असणारे नातेवाईक हे सुपरस्प्रेडर ठरत आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या अंत्यविधीची व्यवस्था शासकीय पातळीवरून करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. रुग्ण मृत्यू पावला तर त्याचे नातेवाईक त्यास गावी घेऊन जातात व मोठ्या गर्दीत त्याचा अंत्यविधी पार पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अंत्यविधीमधूनही कोरोनाचा प्रसार होतो आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीची व्यवस्था शासकीय पातळीवर करता येण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितले. 

इन्फो ग्रामीण भागात बळकटीकरण या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागालाही कोरोनाने वेढले आहे. ग्रामीण भागात ऑक्सिजनसह आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्याची गरज असल्याचे यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयOxygen Cylinderऑक्सिजनChhagan Bhujbalछगन भुजबळ