विवाहीतेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाची तोडफोड
By Admin | Updated: July 28, 2016 00:26 IST2016-07-28T00:21:54+5:302016-07-28T00:26:35+5:30
नामपूर : दंगलीसह शासकीय मालमत्तेच्या नुकासानीचा गुन्हा

विवाहीतेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाची तोडफोड
नामपूर : बागलाण तालुक्यातील गोराणे येथील विवाहिंतेच्या मृत्यूप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी नामपूर ग्रामिण रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली. याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात दंगलीसह शासकीय कामात अडथळा , शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गोराणे येथील विवाहिता सविता अरविंद देसले (२९) व तिचा पती अरविद श्रोवण देसले (३५) हे धार्मिक कार्यक्रमासाठी मंगळवारी (दि.२६) बिलपुरी येथे गेले होते. त्याठिकाणाहून परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने आसखेडा गावाजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना पहाटे तीन वाजता नामपूर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच सविता देसले यांचे निधन
झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागितले. मयत सविताचा घातपाताने मृत्यूू झाल्याचा संशय बिलपुरी येथील च्यिा माहेरच्या मंडळीनी व्यक्त केला. त्यामुळे बिलपुरी गाावातील १०० ते १५० महिला व नागरीकांचा समुदाय ग्रामिण रुग्णालयात दाखल झाला. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी करीत जमावाने ग्रामिण रुग्णालयाची तोडफोड केली. संतप्त जमावाला अटकाव करणाऱ्या पोलिसानाही जमावाने धक्काबुकी केली.
ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मधुकर गावित यांनी तोडफोडप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. मालेगावचे पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राहूल खाडे, कळवणचे डीवायएसपी पाटील, सटाण्याचे पोलिस निरीक्षक बशिर शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. या घटनेचा जायखेड्याचे सहाय्यक निरीक्षक आर.एन.होळकर, उपनिरीक्षक एस.बी.कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)