विश्रामगृहावर घोषणाबाजी
By Admin | Updated: July 8, 2014 00:59 IST2014-07-08T00:20:45+5:302014-07-08T00:59:11+5:30
विश्रामगृहावर घोषणाबाजी

विश्रामगृहावर घोषणाबाजी
सोमवारी दुपारी साडेबारा वाजता गिते शासकीय विश्रामगृहावर हजर होताच, त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने जमा झाले. गिते आणि राज यांची बंद दरवाजाआड चर्चा झाल्यानंतर राज बैठकीतून अचानक निघून गेले आणि काही वेळाने गिते बाहेर आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत असतानाच ‘वसंतभाऊ आगे बढो’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे वातावरण तप्त होईल असे दिसताच गिते यांनी तातडीने घोषणा बंद करण्यास सांगितले, तसेच घोषणा देणाऱ्यांची कानउघडणी करून तेथून जाण्यास सांगितले. दरम्यान, गिते पुन्हा विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराशी येताच पुन्हा घोषणा देण्यात आल्या. यावेळीदेखील गिते समर्थक नेत्यांनी घोषणा बंद केल्या. घोषणाबाजीतून शक्तिप्रदर्शनाचादेखील प्रयत्न झाला.