‘हॉर्स रेस्क्यू’ फत्ते; घोड्याने रात्र काढली चेंबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 04:29 PM2019-07-25T16:29:44+5:302019-07-25T16:32:39+5:30

बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे अंधारात घोड्याचा पाय उघड्या चेंबरमध्ये गेल्याने घोडा चेंबरमध्ये पडला. चेंबर किंमान पंधरा फूट खोल असल्याने घोडा पुर्णपणे त्यामध्ये अडकला. त्यामुळे घोड्याने विव्हळत रात्र चेंबरमध्येच काढली.

'Horse Rescue' The horse spent the night in the chamber | ‘हॉर्स रेस्क्यू’ फत्ते; घोड्याने रात्र काढली चेंबरमध्ये

‘हॉर्स रेस्क्यू’ फत्ते; घोड्याने रात्र काढली चेंबरमध्ये

Next
ठळक मुद्देचेंबर दहा ते पंधरा फूट खोल जवानांनी नागरिकांच्या मदतीने घोड्याला सुखरूप बाहेर काढले.

नाशिक : येथील पखालरोडवरील खोडेनगर भागातील एका मोकळ्या भुखंडावर पसरलेल्या हिरवळीवर भूक भागवत असताना बुधवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास अचानकपणे अंधारात घोड्याचा पाय उघड्या चेंबरमध्ये गेल्याने घोडा चेंबरमध्ये पडला. चेंबर किंमान पंधरा फूट खोल असल्याने घोडा पुर्णपणे त्यामध्ये अडकला. त्यामुळे घोड्याने विव्हळत रात्र चेंबरमध्येच काढली.
भुखंड मोठा असल्याने आजुबाजुला घरेदेखील नसल्यामुळे कोणाच्याही हा प्रकार लक्षात आला नाही. सकाळच्या सुमारास पाऊस असल्याने नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या गुरूवारी (दि.२५) कमी होती. भुखंडामध्ये तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर चिखल असल्याने फेरफटका मारणाऱ्यांनी आतमध्ये जाण्यास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे चेंबरमध्ये विव्हळत असलेल्या घोड्याच्या यातना कोणाच्याही लक्षात आल्या नाही. जवळच असलेल्या घोडा मालकाच्या राहूट्यांवरील एक मेंढपाळ दुपारी सर्व घोड्यांना चरण्यासाठी घेऊन जात असताना त्याच्या ही बाब लक्षात आली. त्यावेळी त्याने परिसरातील स्थानिक नागरिकांची मदत घेत अग्निशमन दलाला माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच सिडको उपकेंद्राच्या बंबासह जवान केंद्रप्रमुख देविदास चंद्रमोरे, लिडिंग फायरमन रविंद्र लाड, फायरमन बाळासाहेब लहांगे, कांतीलाल पवार, संजय गाडेकर, बंबचालक इस्माईल काजी यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले.

चेंबर दहा ते पंधरा फूट खोल होते. सुमारे तीन ते चार फूट उंचीचा घोडा त्यामध्ये पडलेला जवानांना आढळून आला. यावेळी घोड्याला चेंबरमधून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांपुढे उभे राहिले. जवानांनी मेंढपाळांची मदत घेत एका मेंढपाळाला आतमध्ये उतरवून दोरखंड घोड्याला बांधला आणि सर्व जवानांनी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने ताकदीने दोरखंड वर ओढत घोड्याला सुखरूप बाहेर काढले. हा घाडा सटाणा तालुक्यातील कोटबेल गावातील रहिवाशी मेंढपाळ नाना ठका पवार यांच्या मालकीचा असून यांनी या भुखंडावर मागील काही दिवसांपासून कबिल्यासह पडाव टाकला आहे. तेथे ते आपल्या पशुधन व कुटुंबियांसह राहूट्या ठोकून वास्तव्यास आहे. तालुक्यात चारापाण्याची टंचाई असल्यामुळे ते भटकंती करत शहरात काही महिन्यांपुर्वी दाखल झाले आहेत.

Web Title: 'Horse Rescue' The horse spent the night in the chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.