शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी घोडे पालन देखील ठरू शकतो पुरक व्यवसाय: रणजित नगरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:22 IST

नाशिक- अश्व शर्यतीचा क्रिडा प्रकार नाशिकमध्ये रूजला पाहिजे हे खरेच आहे परंतु त्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे बैलजोडी बरोबर घोडा वाढल्यास घोडे पालनाचा वेगळा पुरक व्यवसाय त्यांना उपलब्ध होऊ शकतो असे मत इन्डिजिनिअस हॉर्स ओनस असोसिएशनचे सरचिटणीस रणजित नगरकर यांनी व्यक्त केले. या संस्थेच्या वतीने अश्वशर्यती घेतल्या जातात.

ठळक मुद्देनाशिकमध्ये प्रथमच अश्वशर्यतपोषक वातावरणासाठी प्रयत्न

नाशिक- अश्व शर्यतीचा क्रिडा प्रकार नाशिकमध्ये रूजला पाहिजे हे खरेच आहे परंतु त्या निमित्ताने शेतकऱ्यांकडे बैलजोडी बरोबर घोडा वाढल्यास घोडे पालनाचा वेगळा पुरक व्यवसाय त्यांना उपलब्ध होऊ शकतो असे मत इन्डिजिनिअस हॉर्स ओनस असोसिएशनचे सरचिटणीस रणजित नगरकर यांनी व्यक्त केले. या संस्थेच्या वतीने अश्वशर्यती घेतल्या जातात. रविवारी (दि.१६) नाशिकमध्ये प्रथमच स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- नाशिकमध्ये स्पर्धा घेण्याचे नियोजन काय?नगरकर- आमची संस्था राज्य पातळीवर दरवर्षी लोणावळा येथे स्पर्धा घेत असते. यंदा नाशिकची निवड केली आहे. नाशिक हा प्रयोगशील जिल्हा आहे. येथे क्रिडा क्षेत्रात देखील विविध प्रयोग होत असतात. त्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा नाशिकमध्ये घेत आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांना बैल जोडी बरोबरच घोडे देखील असतात त्यांना देखील विषयाचे महत्व कळले पाहिजे. घोड्याच्या चांगल्या जाती असतील तर अगदी कोटी रूपयांपर्यंत देखील भाव मिळतो. त्यामुळे घोडा पालन हा पुरक व्यवसाय ठरू शकतो. तो देखील स्पर्धा आयोजनामागील उद्येश आहे.

प्रश्न- नाशिक मध्ये घोड्यांच्या छंदाबाबत वातावरण कसे काय आहे?नगरकर- नाशिकमध्य घोडे पाळणे, रपेट करणे असा छंद जोपासणारे अनेक जण आहेत. येवल्याला देखील घोड्याचा बाजार भरतो. घोडयांच्या स्पर्धेबाबत देखील अंत्यत पोषण वातावरण आहे.

प्रश्न- प्रथमच आयोजित केलेल्या स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळाला?नगरकर- नाशिकमध्ये अर्श्व शर्यत प्रथमच होत असली तरी त्याला मिळालेला प्रतिसाद वादातीत आहे. लोणावळ्याला सत्तर ते पंचाहत्तर स्पर्धक सहभागी होत असतात. नाशिकमध्ये चाळीस स्पर्धक सहभागी आहेत. त्यात तीन स्पर्धक राष्टÑीय पातळीवरील आहेत. तर दहा स्पर्धक नाशिक जिल्ह्यातील आहे. त्यामुळे एकुणच या क्रिडा प्रकाराला नाशिकमध्ये चांगला वाव आहे.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीbusinessव्यवसाय