विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:24 IST2018-09-29T22:23:13+5:302018-09-29T22:24:15+5:30

घोटी : घराजवळ बांधलेल्या घोड्याच्या दावणीत वीजप्रवाह उतरल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २९) सकाळी घोटीवाडी येथे घडली. याबाबत वीज वितरण कंपनीने पंचनामा केला.

Horse Due to Electric Shock | विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

ठळक मुद्देदावणीजवळून गेलेल्या वीजवाहिन्यांशी संपर्र्क झाल्याने दावणीत वीजप्रवाह

घोटी : घराजवळ बांधलेल्या घोड्याच्या दावणीत वीजप्रवाह उतरल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २९) सकाळी घोटीवाडी येथे घडली. याबाबत वीज वितरण कंपनीने पंचनामा केला.
या घटनेची माहिती भोर यांना समजताच त्यांनी संजय जाधव व राजेंद्र जाधव यांना कळविले. त्यांनी पोलीस व वीज कंपनीला सदर बातमी दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. वीज कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी संजय जाधव व राजेंद्र जाधव यांनी केली आहे. घोटीवाडी येथील शेतकरी भगीरथ लक्ष्मण भोर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून घोडा घेतला होता. समारंभात व मिरवणुकीत नाचणारा घोडा म्हणून त्याची ओळख असल्याने या घोड्याला चांगली मागणी होती. तब्बल सव्वा लाख रु पये किमतीचा घोडा भोर यांनी घरासमोरील लोखंडी दावणीला बांधला होता. या दावणीजवळून गेलेल्या वीजवाहिन्यांशी संपर्र्क झाल्याने दावणीत वीजप्रवाह उतरल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Horse Due to Electric Shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.