होरायझन अकॅडमीने राबविले ‘ग्रीन मॅरेथॉन’प्रकल्प
By Admin | Updated: September 20, 2016 00:57 IST2016-09-20T00:57:08+5:302016-09-20T00:57:46+5:30
तीन दिवसांत ९९९९ रोपे तयार

होरायझन अकॅडमीने राबविले ‘ग्रीन मॅरेथॉन’प्रकल्प
होरायझन अकॅडमीने राबविले ‘ग्रीन मॅरेथॉन’प्रकल्प : तीन दिवसांत ९९९९ रोपे तयारनाशिक : मराठा विद्या प्रसारक संचलित होरायझन अकॅडमी येथे नुकतीच ९९९९ रोपे लागवडीसाठी तयार करण्यासाठी ‘ग्रीन मॅरेथॉन’ हा प्रकल्प विद्यार्थी व शिक्षकांमार्फत राबवला गेला. या त्रिदिवसीय प्रकल्पामध्ये एकूण १000 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
शाळेने या प्रकल्पासाठी लागणारी माती, कोकोपीट, पिशव्या, नैसर्गिक जंतुनाशक, खते इत्यादीचा पुरवठा केला. लागणारे सर्व साहित्य योग्य प्रमाणात एकत्र करून या प्रक्रियेसाठी वापरले गेले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेबद्दल प्रशिक्षण दिले गेले. होरायझन अकॅडमीच्या इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त रोपे तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे. रोटरी क्लब इस्टचे सचिव संयोजक हेमलता तोलानी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ग्रीन मॅरेथॉन प्रकल्पासाठी विद्यार्थी व शिक्षकांना गिव्ह फाउंडेशनच्या सदस्यांकडून प्रशिक्षण मिळाले. या उपक्रमात रमेश अय्यर, हेमलता तोलानी, सुनंदा जाधव, संध्या कुलकर्णी आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)लागवडीसाठी तयार केलेली रोपे संवर्धन करून शहराच्या विविध भागात वृक्षारोपण केले जाईल. शाळेचे प्राचार्य कुमुदिनी बंगेरा यांच्या नेतृत्वाखाली जो प्रकल्प राबविला गेला तो रमेश अय्यर यांच्या अंकुर प्रकल्पाचा एक भाग आहे. नाशिक शहरामध्ये १ कोटी झाडांची लागवड करण्याची गरज आहे.