कबड्डीच्या पुनर्वैभवाच्या आशा़

By Admin | Updated: July 15, 2014 00:47 IST2014-07-14T23:04:41+5:302014-07-15T00:47:16+5:30

कबड्डीच्या पुनर्वैभवाच्या आशा़

Hope for the rejuvenation of kabaddi | कबड्डीच्या पुनर्वैभवाच्या आशा़

कबड्डीच्या पुनर्वैभवाच्या आशा़

नाशिक : गुलालवाडी, रचना क्लबच्या कबड्डीपटूंची नावे घेतली तरी अनेक संघांना धडकी भरायची़ यातही नाशिकच्या मुलींच्या संघाचा राज्यभरात मोठा दबदबा होता़ परंतु बदलते क्रीडा धोरण, संघटनात्मकतेचा अभाव, संघटनेसह खेळाडूंचे कबड्डीकडे झालेले दुर्लक्ष, प्रशिक्षकांची कमतरता यामुळे १९८५ नंतर नाशिकच्या कबड्डीला ओहोटी लागली ती आत्तापर्यंत. मुली वगळता नाशिकचे कबड्डीपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर आढळतही नाहीत़ या सर्व कटू आठवणी बाजूला सारत आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या जिल्हा कबड्डी संघटनेने पुन्हा बाळसे धरले आहे़ कबड्डीचे नाशिकचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू पाठविण्यासाठी संघटनात्मक योजना सुरू करण्यात आल्या आहेत़ यास क्रीडाधिकारी कार्यालय, क्रीडा प्रबोधिनी व नाशिककरांची साथ लाभल्यास हे वैभव पुन्हा सहज प्राप्त करता येणार असल्याची आशा जुने कबड्डीपटू, प्रशिक्षक, संघटक तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे़

Web Title: Hope for the rejuvenation of kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.