शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

नाशिक पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:45 IST

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर

ठळक मुद्देपालेभाज्या, फळभाज्यांना प्राधान्य : परतीच्या पावसावर लक्षपंचक्रोशीतील शेतकरी शेतातील माल काढणीचे वेळापत्रकाही ठरवून घेतले

नाशिक : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतक-याचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, कोथिंबीर, भेंडी, गवार, वांगे याबरोबरच कारले, गिलके, भोपळा, दोडका, डांगर या पालेभाज्या व फळभाज्यांचे पिके बारमाही घेतली जातात. हा सर्व शेतमाल नाशिकरोड सिन्नरफाटा मार्केट, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर सायखेडा, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. किरकोळ भाजीपाला विक्रेते मोटारसायकलवर गाठोडे बांधून किंवा एक दोन क्रेट ठेवून नाशिकरोड उड्डाण पुलाखाली तसेच जेलरोड सायट्रिक कंपनीच्या समोरील भाजीबाजारात विक्रीसाठी पाठवितात. फळभाज्या व पालेभाज्यांच्या बाजारातील आवकेवरच लिलावाचे भाव अवलंबून असल्यामुळे पूर्व भागातील शेतक-यांकडून बाजारात एकाच प्रकारच्या भाजीपाल्याची जादा आवक होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी शेतातील माल काढणीचे वेळापत्रकाही ठरवून घेतले आहे.चौकट===रब्बीवर आशा लागूनपोळ्याच्या आमावस्येनंतर सुरू होणाºया भाद्रपदाच्या पहिल्या पंधरवड्याला सुना भादवा आणि दुसºया पंधरवड्याला जेवता भादवा अर्थात पित्रुपक्ष म्हणतात. भाद्रपदाचे ऊन फारच कडक असते. या उन्हाचा काही पिकांना लाभ तर काहींना नुकसान पोहोचते. अशा वेळीच परतीच्या पावसाला सुरुवात होत असल्याने हा पाऊस शेतीसाठी खूपच लाभदायी असतो. या पावसामुळे विहिरींना पाणी उतरते पुढे हेच विहिरीचे पाणी रब्बी हंगामातील पिकांनाही उपयुक्त ठरते. सप्टेंबरअखेर व आक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीन, भुईमूग, मका, कपाशी, बाजरी, तूर, मूग, मठ ही पिके काढली जातात व त्यानंतर शेतकरी रब्बीच्या तयारीला लागतो. दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, कांदे ही पिके पेरण्यास सुरुवात करतात.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक