नाशिककरांना हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:26 IST2020-01-17T00:06:59+5:302020-01-17T01:26:05+5:30
जिल्हा अचानकपणे गुरुवारी (दि.१६) गारठला. राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान ९.८ अंश इतके सकाळी नोंदविले गेले. तापमानाचा पारा १५ अंशांवरून थेट खाली घसरला. मंगळवारी (दि.१४) किमान तापमान १५ अंश इतके नोंदविले गेले होते. थंडीचा कहर वाढल्यामुळे दिवसाही नागरिकांना उबदार कपडे आणि शेकोटीचा आश्रय घ्यावा लागत आहे.

नाशिककरांना हुडहुडी
नाशिक : शहरासह जिल्हा अचानकपणे गुरुवारी (दि.१६) गारठला. राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान ९.८ अंश इतके सकाळी नोंदविले गेले. तापमानाचा पारा १५ अंशांवरून थेट खाली घसरला. मंगळवारी (दि.१४) किमान तापमान १५ अंश इतके नोंदविले गेले होते. थंडीचा कहर वाढल्यामुळे दिवसाही नागरिकांना उबदार कपडे आणि शेकोटीचा आश्रय घ्यावा लागत आहे.
नव्या वर्षाच्या थंडीची तीव्रता वाढली आहे, मात्र किमान तापमानाचा पारा १०.२ अंशापेक्षा खाली या हंगामात घसरला नव्हता. गुरुवारी प्रथमच पारा ९.८ अंशापर्यंत खाली घसरला. यामुळे नागरिकांना थंडीची प्रचंड तीव्रता जाणवली. पहाटेच्या सुमारास जोरदार थंडी पडत असल्याने नाशिककरांचा दिवस उशिरा सुरू होतो.
तीव्रता वाढली
मकरसंक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी होण्यास सुरुवात होते, असे बोलले जाते. यावर्षी मात्र थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे जानेवारीच्या मध्यावर पारा दहा अंशापेक्षा खाली घसरल्याची नोंद झाली. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पारा दहा अंशाच खाली आला होता.
४ पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. थंडीची तीव्रता वाढल्याने सर्दी-पडसे, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या आजाराचा उपद्रव वाढला आहे. लहान-मोठ्यांना त्रास होत असल्याने खासगी रुग्णालय तसेच सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे.