यशोदीप परिवाराकडून गुणवंतांचा सन्मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST2021-09-10T04:19:28+5:302021-09-10T04:19:28+5:30

पेठ -तालुक्यात गरजवंतांना मदतीचा हात देणाऱ्या यशोदीप परिवाराच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व शालेय बालकांना शैक्षणिक ...

Honors from Yashodip family! | यशोदीप परिवाराकडून गुणवंतांचा सन्मान !

यशोदीप परिवाराकडून गुणवंतांचा सन्मान !

पेठ -तालुक्यात गरजवंतांना मदतीचा हात देणाऱ्या यशोदीप परिवाराच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व शालेय बालकांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यशोदीप परिवाराच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या कै. योगेश जाधव व कै. मुरलीधर चौधरी यांच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्यात यासाठी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामकाज करणारे लेखक, कवी, कलाकार देवदत्त हरी चौधरी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. बारवपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना जाधव परिवाराच्यावतीने गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी रामदास गवळी, यशोदीप संस्थेचे अध्यक्ष गिरीश गावीत, रमेश चौधरी यांचेसह शिक्षक संघटना प्रतिनिधी, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

-----------------------

बारवपाडा ता. पेठ येथे कवी देवदत्त चौधरी यांचा सन्मान करताना गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, गिरीश गावीत, रामदास गवळी, रमेश चौधरी, संजय भोये , मंदा जाधव आदी. (०९ पेठ यशोदीप)

090921\09nsk_3_09092021_13.jpg

०९ पेठ यशोदीप

Web Title: Honors from Yashodip family!