सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST2021-01-04T04:12:28+5:302021-01-04T04:12:28+5:30

नाशिक : कालिका मंदिर देवी ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी.एस.फाउंडेशन यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ...

Honoring of women on the occasion of Savitribai Phule Jayanti | सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

नाशिक : कालिका मंदिर देवी ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी.एस.फाउंडेशन यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात राहून समाजसेवा करणाऱ्या आठ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती वत्सला खैरे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.छाया नवले, कृषी अधिकारी अनुपमा घोलप, सामाजिक आणि महिला सक्षमीकरण क्षत्रेतील पूर्वा मिठारी, शासकीय सेवेतील वैशाली पाटील, शिक्षण क्षेत्रातील शालिनी बच्छाव, उद्योग क्षेत्रातील प्राजक्ता देशपांडे, राष्ट्रीय पदकविजेती खेळाडू सायली सूर्यवंशी या आठ पुरस्कारार्थींचा समावेश होता. या पुरस्कारार्थींना प्रमुख पाहुणे कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, क्रीडा संघटक अशोक दुधारे, राजू शिंदे, आनंद खरे, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह प्रदान करू गौरविण्यात आले.

यावेळी डॉ. छाया नवले आणि शालिनी बच्छाव यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले तर सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले.

फोटो. :- ०३ महिला सन्मान

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानप्रसंगी वत्सला खैरे, डॉ.छाया नवले, अनुपमा घोलप, पूर्वा मिठारी, वैशाली पाटील, शालिनी बच्छाव, प्राजक्ता देशपांडे, सायली सूर्यवंशी यांच्यासोबत प्रमुख पाहुणे केशव अण्णा पाटील, अशोक दुधारे, राजू शिंदे, आनंद खरे, विलास पाटील आदी.

Web Title: Honoring of women on the occasion of Savitribai Phule Jayanti