रोटरीतर्फे मान्यवर सन्मानित

By Admin | Updated: June 3, 2016 22:58 IST2016-06-03T22:56:47+5:302016-06-03T22:58:08+5:30

रोटरीतर्फे मान्यवर सन्मानित

Honored by Rotary Honor | रोटरीतर्फे मान्यवर सन्मानित

रोटरीतर्फे मान्यवर सन्मानित

देवळाली कॅम्प : दारणा नदीच्या किनाऱ्यालगतच्या परिसरात विविध क्षेत्रात प्रचंड काम करणाऱ्या परंतु अप्रकाशित असणाऱ्या ताऱ्यांना शोधून त्यांना प्रकाशित करण्याचे काम देवळाली रोटरी क्लबने केले असल्याचे प्रतिपादन कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह व उद्योजक लोकेश शेवडे यांनी केले.
येथील रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे गुणगौरव पुरस्कार रोटरी क्लबच्या सभागृहात वितरित करण्यात आले, त्यावेळी शेवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज कल्याणकर, तर व्यासपीठावर सचिव डॉ. अमृत पाठक, सेवानिवृत्त ब्रिगेडियर अनिल गर्ग होते. गुणगौरव समितीचे अध्यक्ष डॉ. अरु ण स्वादी यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार्थींमध्ये डॉ. मनोहर जाधव (क्रीडा), शालिनी वैद्य (ज्येष्ठ नागरिक), मास्टर स्पोर्ट्स क्लब (संस्था), लहवित गाव (ग्रामपंचायत), सुभाष खालकर (शैक्षणिक व सामाजिक), प्रशांत धिवंदे (पत्रकारिता), जमील सय्यद
(क्रीडा), विकास आडके (संगीत), प्रेम उजागरे (शरीरसौष्ठव), संग्राम गायकवाड व फिजलद जावेद खान (क्रीडा), रमाकांत डास (सेवाकार्य) आदिंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अमन वर्मा याने शालांत परीक्षेत मिळवलेल्या नैपुण्याबद्दल सत्कार करण्यात आला.आभार ब्रिगेडीअर अनिल गर्ग यांनी मानले.
कार्यक्रमास महाराज बिरमानी, निवेदिता अथनी, डॉ.अलका स्वादी, विजय शेट्टी, रमेश थोरात, बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव, अ‍ॅड. एन. के. चौधरी, जगदीश गोडसे, संजय गोडसे, सुरेश कदम, अ‍ॅड. एस. आर. ठाकूर, संपत सातपुते, संजीवनी बक्षी, कर्नल शेगावकर, प्रा. सुनीता आडके, कमलेश वर्मा, आशा शेट्टी, बोधराज वर्मा, अ‍ॅड. अशोक आडके, शंकर मुठाळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Honored by Rotary Honor