निराधार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
By Admin | Updated: October 11, 2014 21:50 IST2014-10-11T21:50:08+5:302014-10-11T21:50:08+5:30
निराधार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

निराधार ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
नाशिक : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने पाच निराधार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर श्री ब्रह्मानंद भजन सेवा मंडळाच्या वतीने ‘भजन संध्या’ आयोजित करण्यात आली होती.
पंचवटीतील पलुस्कर सभागृहात आयोजित कार्यक्रमात निराधार ज्येष्ठ नागरिक गोपाल जंजाळकर (साफसफाई), कोंडाबाई गोडे (धुणीभांडी), मुरलीधर कारवाल (हमाली), सुनंदा सासवडे (मजुरी), श्रीमती वैद्य (अपार्टमेंट सफाई) यांचा सत्कार डॉ. नूतन दर्डा, सुरेश विसपुते, पद्माकर महाजन, जितेंद्र येवले, श्याम दशपुते, एम. जी. कुलकर्णी व भा. रा. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंचाचे कार्याध्यक्ष शरद बुरकुले यांनी निराधार ज्येष्ठांचा सन्मान करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना वासन आय केअर हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्रतपासणीचे कूपन देण्यात आले. दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठांना हॉस्पिटलच्या वतीने सहकार्य करण्यात येणार असल्याचे डॉ. नूतन दर्डा यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यानंतर श्री ब्रह्मानंद भजन सेवा मंडळाच्या अकरा सदस्यांनी सुश्राव्य भजन सादर केले. (प्रतिनिधी)