नांदगाव शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:22 IST2019-07-10T17:21:31+5:302019-07-10T17:22:25+5:30
देवगाव : जगदंबा शिक्षण संस्था, येवला व मातोश्री शिक्षण संस्था, नाशिक यांच्याकडून लासलगाव परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

नांदगाव जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा गौरव करतांना व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, उपस्थित मान्यवर.
देवगाव : जगदंबा शिक्षण संस्था, येवला व मातोश्री शिक्षण संस्था, नाशिक यांच्याकडून लासलगाव परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील जिल्हा परिषद नांदगाव शाळेतील नवोदय विद्यालयात निवड झालेले-अथर्व नवले, महेश नवले, स्नेहल बागल, शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक-महेश नवले, अथर्व नवले, शिष्यवत्ती पात्र-ज्ञानेश्वरी निकम, आदित्य निकम, रितेश नागरे, आरती निकम, प्रांचल निकम, कल्याणी फड, मयूर निकम, आदिती निकम, स्नेहल बागल, गायत्री सांगळे, ईश्वरी निकम आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक रमेश सोनवणे, शिक्षक प्रशांत तुपे, अशोक गवळी यांचाही मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्र माला डॉ. विलास कांगणे, लक्ष्मण दराडे, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, प्रा. संदीप देशपांडे, रतन बोरणारे, सुनिल आब्बड, योगेश पाटील, डॉ. किरण निकम, डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. अमोल शेजवळ, विशाल पालवे, निलेश लचके, किशोर जाधव, दीपक परदेशी, बाळासाहेब बोरसे, दर्शन साबद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. विलास कांगणे यांनी सुत्रसंचालन तर तुषार देवरे यांनी आभार मानले.