आदिवासी शिक्षक संघटनेकडून शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:43+5:302021-09-26T04:15:43+5:30

कळवण : तालुक्यातील शिक्षक आणि शाळा या गुणवंत प्रधान आहेत. कोरोना काळात तालुक्यातील शिक्षकांनी केलेले मदत कार्य कौतुकास्पद ...

Honor of teachers from Tribal Teachers Association | आदिवासी शिक्षक संघटनेकडून शिक्षकांचा गौरव

आदिवासी शिक्षक संघटनेकडून शिक्षकांचा गौरव

कळवण : तालुक्यातील शिक्षक आणि शाळा या गुणवंत प्रधान आहेत. कोरोना काळात तालुक्यातील शिक्षकांनी केलेले मदत कार्य कौतुकास्पद असून, जिल्ह्याला मार्गदर्शक ठरले आहे. त्यामुळे चांगल्या कामाचे मी नेहमीच कौतुक करतो आणि पाठराखण करतो, असे सांगून शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार, अशी ग्वाही देऊन आदिवासी शिक्षक संघटनेने शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला, हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना कळवण तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव व पुरस्कार सोहळा आमदार पवार साहेब यांच्या हस्ते कळवण पंचायत समिती सभागृहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण पंचायत समिती सभापती मनीषा पवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती विजय शिरसाठ, पंचायत समिती सदस्य आशा पवार, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, संजय सोनवणे, मोतीराम भोये, परशराम पाडवी, रामचंद्र जाधव, गुलाब चव्हाण, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात वसंत पवार (केंद्र बंधारपाडा), नामदेव राऊत (केंद्र नांदुरी), शिवाजी पवार (केंद्र देसगाव), सुशीला गवळी (केंद्र पिंपळे खुर्द), योगिता गवळी (केंद्र जयदर), मंगला चौधरी (केंद्र दळवट), दौलत साबळे (केंद्र अभोणा), अनुसया गायकवाड (केंद्र चणकापूर), राजू देवरे (केंद्र कुमसाडी), रत्नाकर कवर (केंद्र चिंचपाडा), तुकाराम भान्शी (केंद्र कनाशी), देवीदास कोकणी (केंद्र पाळे), भिलाबाई देशमुख (केंद्र मोकभणगी), हेमलता गावीत (केंद्र कळवण), दशरथ गोवेकर (केंद्र बेज), राजेंद्र जाधव (केंद्र ओतूर), संगीता आंबेकर (केंद्र मोकभनगी), मनीषा केदारे (केंद्र ओतूर) व जीवन गौरव पुरस्कार बापू बहिरम (सेवानिवृत्त केंद्रप्रमुख) यांचा समावेश आहे. गुणवंत अधिकारी पुरस्कारांमध्ये निशादेवी गिरी (केंद्रप्रमुख कळवण) व परशराम महाले (शिक्षण विस्तार अधिकारी), हेमंत बच्छाव (गटशिक्षणाधिकारी कळवण) यांचा समावेश आहे. (२५ कळवण १)

250921\25nsk_24_25092021_13.jpg

२५ कळवण १

Web Title: Honor of teachers from Tribal Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.