सैनिक पत्नी व मातांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:59 IST2019-03-11T15:59:43+5:302019-03-11T15:59:55+5:30

जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊन सामाजिक संस्थाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय पिंपळगाव ग्रेपटाऊन ने सैनिक पत्नी व मातांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी जेसीआय इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅनीश मॅथ्यू यांनी पिंपळगाव ग्रेपटाऊन च्या कार्याचा आढावा घेण्यासाठी भेट दिली त्याच अनुषंगाने राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करु न सत्कारमूर्तींचा प्रमाणपत्र व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

 Honor of soldiers and mothers | सैनिक पत्नी व मातांचा सन्मान

सैनिक पत्नी व मातांचा सन्मान

ठळक मुद्देसैनिक पत्नींनी देशभक्तीपर गीत सादर केले. मनोगत व्यक्त करताना या माता भावुक झाल्या होत्या.


जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊन सामाजिक संस्थाच्या वतीने
महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय पिंपळगाव ग्रेपटाऊन ने सैनिक पत्नी व मातांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी जेसीआय इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅनीश मॅथ्यू यांनी पिंपळगाव ग्रेपटाऊन च्या कार्याचा आढावा घेण्यासाठी भेट दिली त्याच अनुषंगाने राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपण करु न सत्कारमूर्तींचा प्रमाणपत्र व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
याबरोबरच सौ उषा दवंगे, सौ मीना दिवेकर या पिंपळगावकर कर्तृत्ववान महिलांचाही सत्कार करण्यात आला. नवजीवन हेल्थ क्लब चे सभासद राज्यस्तरीय कुस्तीपटू मनिषा सिंग, राष्ट्रीय कॅनोर्इंग खेळाडू राखी गेहलोत यांचाही उत्कृष्ट कामिगरी बद्दल सत्कार करण्यात आला .
यावेळी अध्यक्ष डॉ सुधीर भांबर ,भरत निमसे, सुधाकर कापडी, निलेश मांदळे, नितीन गोरे या वरिष्ठ जेसीज बरोबर मंचावर महिला अध्यक्षा प्रियंका आथरे, डॉ संदिप वाघ, विकास आथरे आदीसह केशवराव बनकर, श्रीनिवास गायकवाड, नंदुमामा सोनवणे, ज्ञानेश्वर उगले, राजु पटेल, डॉ गोरख कागदे, पांडुरंग दवंगे, विलास विधाते याशिवाय महिला सदस्य डॉ योगिता भांबर, योगिता कापडी, तृप्ती मोरे, ममता कागदे याही उपस्थित होत्या.

 ...

Web Title:  Honor of soldiers and mothers