वंशाच्या पणती जपणाऱ्या पालकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 17:14 IST2019-04-10T17:12:48+5:302019-04-10T17:14:11+5:30
सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिड-टाउन तर्फेजेष्ठ नागरिक व वंशाच्या पणती जपणाऱ्या पालकांचा समारंभपुर्वक सत्कार सटाणा येथे करण्यात आला.

रोटरी क्लब आॅफ सटाणा मिड टाउनतर्फे वंशाची पणती जपणाºया पालकांचा सन्मान करतांना प्रांतपाल राजीव शर्मा. समवेत विश्वास चंद्रात्रे, सुरेश बागड, यशवंत अमृतकर, विवेक जगताप, सचिन दशपुते.
सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा मिड-टाउन तर्फेजेष्ठ नागरिक व वंशाच्या पणती जपणाऱ्या पालकांचा समारंभपुर्वक सत्कार सटाणा येथे करण्यात आला.
विविध क्षेत्रात महिलांकडे नेतृत्व असतांना समाजाने अधिक प्रगती केली असून समाजाने मुलींच्या समान अस्तित्वाबाबत मुलांना देखील जाणीव करण्याचे आवाहन रोटरी क्लबचे प्रांतपाल राजीव शर्मा यांनी केले.
यावेळी शर्मा यांच्या हस्ते कन्यारत्न प्राप्त पालकांचा सत्कार करण्यात आला. प्रांतपाल शर्मा हे देखील मुलीचे पालक असल्याने त्यांना रोटरी तर्फे सन्मानित करण्यात आले. जेष्ठ नागरिकांना यावेळी प्रथोमाचार पेटीचे वाटप करण्यात आले.
रोटरीचे सहप्रांतपाल यशवंत अमृतकर यांनी आगामी काळात वयोवृद्ध व्यक्तींसाठी आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. कार्यक्र मात जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बागड यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी सचिव सचिन दशपुते यांनी रोटरीअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्र मांची माहिती दिली.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष विवेक जगताप, बागलाण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, प्रकाश सोनग्रा, भास्कर सोनवणे, बाबुलाल मोरे, शिवाजी आहिरे, जगदीश मुंडावरे, राहुल जाधव, सुरेश येवला, केशव सोनवणे, योगेश अमृतकर, रु पाली कोठावदे, कल्पना येवला, विद्या अमृतकर, रु पाली पंडित, चंद्रकांत विखरणकार, अतुल पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार महाजन व आभार प्रदर्शन मनोज येवला यांनी केले.