शहर-ए-खतीब यांच्याकडून पत्रकारांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:44 IST2021-01-08T04:44:01+5:302021-01-08T04:44:01+5:30

लोकप्रतिनिधींसह प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारांकडून केले जात असते. समाजाचा अविभाज्य घटन म्हणून पत्रकाराची ओळख आहे. समाजाच्या नागरी समस्यांना ...

Honor of journalists from Shahar-e-Khatib | शहर-ए-खतीब यांच्याकडून पत्रकारांचा गौरव

शहर-ए-खतीब यांच्याकडून पत्रकारांचा गौरव

लोकप्रतिनिधींसह प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारांकडून केले जात असते. समाजाचा अविभाज्य घटन म्हणून पत्रकाराची ओळख आहे. समाजाच्या नागरी समस्यांना पत्रकार आपल्या लेखणीद्वारे वाचा फोडत असतो, असे गोडसे यावेळी म्हणाले.

दरम्यान, याप्रसंगी खतीब यांच्या हस्ते ‘लोकमत’चे उपसंपादक अझहर शेख यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच पत्रकार लियाकत पठाण, खान नजमुल इस्लाम, फारुक पठाण, जहीर शेख, अब्दुल कादिर पठाण, तौसिफ शेख, युनूस शेख, रोहण दाणी, इसहाक कुरेशी, गुड्डू शेख आदींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी उपमहापौर प्रथमेश गिते, पश्चिम प्रभाग सभापती ॲड. वैशाली भोसले, वत्सला खैरे, समीना मेमन, मुशीर सय्यद, आशा तडवी, हेमलता पाटील, ॲड. आकाश छाजेड, गुलजार कोकणी, सिराज कोकणी, एजाज रझा मकरानी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक माजी नगरसेवक निजाम कोकणी यांनी केले. सूत्रसंचालन एजाज अंजुम यांनी केले . आभार अल मोइन फाउण्डेशनचे अध्यक्ष अक्रम खतीब यांनी मानले.

Web Title: Honor of journalists from Shahar-e-Khatib