कुंदेवाडी ग्रामपंचायतीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST2021-03-13T04:24:53+5:302021-03-13T04:24:53+5:30

सिन्नर : कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कुंदेवाडी ग्रामपंचायतीकडून सन्मान करण्यात आला. आरोग्य अधिकारी डॉ. शीतल गाडे, आरोग्यसेविका ...

Honor of Corona Warriors from Kundewadi Gram Panchayat | कुंदेवाडी ग्रामपंचायतीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कुंदेवाडी ग्रामपंचायतीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

सिन्नर : कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कुंदेवाडी ग्रामपंचायतीकडून सन्मान करण्यात आला.

आरोग्य अधिकारी डॉ. शीतल गाडे, आरोग्यसेविका ए. आर. तवर, एस. डी. जाधव, आशासेविका सुमन दोडके, अर्चना नाठे, आशा जगताप, ललिता साळंके, अंगणवाडी कार्यकर्ती अनुराधा माळी, मनीषा नाठे, वैशाली गोळेसर, अंगणवाडी मदतनीस कल्पना भालेराव, सिंधू माळी, ग्रामविकास अधिकारी एस. बी. पवार, लिपिक आर. बी. माळी, सफाई कर्मचारी सतीश पिंपळे या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित महिला सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला सुरेश कुऱ्हाडे, भाऊसाहेब नाठे, संजय गाडेकर, हेमंत माळी, दत्तात्रय चव्हाणके, अनिल पोटे, सरपंच रतन नाठे, उपसरपंच विष्णू माळी, सुनील माळी, भाऊराव माळी, सचिन गोळेसर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Honor of Corona Warriors from Kundewadi Gram Panchayat