मुलींना सैन्यात सन्मान अन् सुरक्षा

By Admin | Updated: July 3, 2017 00:34 IST2017-07-03T00:33:53+5:302017-07-03T00:34:10+5:30

नाशिक : मुलींना सैन्य दलात मोठ्या संधी असून, वाटा प्रशस्त करण्यासाठी समाजाने पाठबळ देणे आवश्यक आहे.

Honor and security of girls in the army | मुलींना सैन्यात सन्मान अन् सुरक्षा

मुलींना सैन्यात सन्मान अन् सुरक्षा

ंलोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मुलींना सैन्य दलात मोठ्या संधी असून, मुलींच्या सैन्य दलाच्या वाटा अधिक प्रशस्त करण्यासाठी समाजाने तयारी दर्शवून पाठबळ देणे तितकेच आवश्यक आहे. मुलींसाठी सन्मान व सुरक्षितता प्रदान करणारे क्षेत्र म्हणून सैन्याकडे बघितले जावे, असे मत पुण्याच्या आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.
भोसला सैनिकी मुलींच्या शाळेच्या सोहळ्याप्रसंगी कानिटकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी कानिटकर यांनी सांगितले, भारतीय सैन्य दलाची वैद्यकीय स्थिती उत्तम असून, सहा हजार तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेशी संलग्न असलेले २५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

Web Title: Honor and security of girls in the army