आखाडा परिषदेच्या अध्यक्ष, महासचिवांचा सत्कारं
By Admin | Updated: August 3, 2014 20:43 IST2014-08-03T20:43:06+5:302014-08-03T20:43:06+5:30
आखाडा परिषदेच्या अध्यक्ष, महासचिवांचा सत्कारं

आखाडा परिषदेच्या अध्यक्ष, महासचिवांचा सत्कारं
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर अखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी स्वामी सागरानंद सरस्वती व महासचिवपदी जुना आखाडा निलपर्वताचे आंतरराष्ट्रीय महासचिव महंत हिरगिरीजी महाराज यांनी पदभार स्विकारल्यानंतर आज येथील सर्वच्या सर्व साधु-महंतांतर्फे हद्य सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांना या दोन्हीही महात्म्यांना शुभेच्छा दिल्या. तर गावातील सर्व भक्तजण-भाविक तसेच गत १२ वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर कुंभमेळा तथा नाशिकचे ग्रामीण पोलिस अधिक्षक रविंद्रजी सिंगल, नगरसेवक, देवस्थान विश्वस्थ आ. रामकृष्ण पाटील (वैजापूर) आदींनीही सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभृमीवर काल नव्याने कार्यकारिणी अर्थत अध्यक्ष आणि महसचिव या पदाची नियुक्ती केली. अन्य पदाधिकारी निवड नंतर होईल असे दोन पदाधिकाऱ्यांनी सांगितले आज अध्यक्ष आणि महासचिव पदाचा कार्यभार हिशोबाच्या डायऱ्या आदि भृतपूर्व महासचिव स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी महंत हिरगीरीजींच्या ताब्यात दिले. त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळ्याच्या दोन पर्वण्या प्रत्येक शाही पर्वणीपूर्वी २ दिवस अखाडा परिषदेची बैठक घेतली जाईल. या शिवाय प्रत्येक आखाड्याच्या पेशवाई मिरवणूका देखील नियोजनबद्धरित्या काढल्या जातील. ध्वजारोहण प्रत्येक आखाड्यात केले जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान सध्या शासनातर्फे तयारी सुरु आहे. ती योग्य असून काही गोष्टी प्रशासकांच्या मनाप्रमाणे करु देणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीला नाके मुरुडून चालणार नसल्याचेही या दोन्ही महात्म्यांनी सांगितले.
यावेळी निरंजनी अखाडा महासचिव महंत नरेंद्रगिरीजी, जुना अखाडा, आंतरराष्ट्रीय महासचिव प्रेमगिरीजी, आनंद अखाडा, महंत शंकरानंद सरस्वती, उदासिन बडा अखाडा- कोठारी मुकामी- महंत प्रेमानंदजी, नया उदासिन महंत विचारदासजी, निर्मल अखाडा- महंत- राजेंद्रसिंहजी, आदी सर्व अखाड्याचे संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर माजी नगराध्यक्ष योगेश तुंगार, सुनिल अडसरे, लक्ष्मीकांत थेटे, दिपक लठ्ठा, देवस्थान विश्वस्त कैलास घुले, सचिंद्र पाचोरकर, वैजापूरचे आमदार रामकृष्ण पाटील, आदी महाराष्ट्र भरातून शिष्य परिवार उपस्थित होता. (वार्ताहर)