गृहरक्षक दलाच्या जवानाची आत्महत्त्या
By Admin | Updated: July 23, 2014 00:27 IST2014-07-22T23:25:21+5:302014-07-23T00:27:55+5:30
गृहरक्षक दलाच्या जवानाची आत्महत्त्या

गृहरक्षक दलाच्या जवानाची आत्महत्त्या
जायखेडा : येथील पोलीस ठाणेलगतचा गृहरक्षक दलाच्या कार्यालयात विशाल दादाजी अहिरे (२२) या गृहरक्षक दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्येचे कारण समजू शकते नाही.
सायंकाळी पोलिसांतर्फे पोलीस मैदानावर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम होमगार्ड कार्यालयात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यालयाची व्यवस्था पाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय बच्छाव गेले असता हा युवक त्यांना गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी पोलिसांत खबर दिली. मयत विशालचे वडील दादाजी अहिरे गृहरक्षक दलाचे प्रभारी अधिकारी असून तोही दोन-तीन वर्षापासून गृहरक्षक दलात कार्यरत होता. नामपूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)