झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:25 AM2018-02-25T01:25:34+5:302018-02-25T01:25:34+5:30

प्रभाग क्र मांक ३० मधील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शंभरफुटी रस्तालगत असलेल्या घरकुल योजनेतील ९२ घरकुलांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. अजय मित्रमंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

Homework allocations to the slum beneficiaries | झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप

झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप

Next

इंदिरानगर : प्रभाग क्र मांक ३० मधील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शंभरफुटी रस्तालगत असलेल्या घरकुल योजनेतील ९२ घरकुलांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. अजय मित्रमंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.  सुमारे दीड महिन्यापूर्वी महापालिकेच्या अतिक्र मण निर्मूलन विभागाने मोठा पोलीस ताफा घेऊन अतिक्र मण मोहीम राबवली. त्यावेळी अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यातील लाभार्थ्यांची पाहणी करून कागदपत्र गोळा करण्यात आले होते. त्यांची सोडत सोडत पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्यात आले. यावेळी समाधान गवळी या लाभार्थ्याचे नाव पुकारून त्यांच्या हस्ते त्यांच्या घरकुलाचा क्र मांक सोडत पद्धतीने काढण्यात आला. अशा प्रकारे प्रत्येक लाभार्थ्याचे नाव पुकारून त्यांच्या हस्ते त्यांच्या घरकुलाचा क्र मांक काढण्यात आला. ज्या लाभार्थ्यांनी पैसे भरले त्यांना तातडीने घरकुलाची चावी देण्यात आली. व्यासपीठावर नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सचिन कुलकर्णी, प्रभारी झोपडपट्टी सुधारणा अधिकारी आर. जे. हिंगमिरे, संजय उन्हावणे, रतिलाल बच्छाव, महेश जाधव, डी. जी. बागुल, राम कपोते आदी उपस्थित होते.
वडाळागावातील शंभरफुटी रस्त्यालगत असलेल्या घरकुल योजनेत ७२० घरकुलांपैकी ३७४ घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. आज ९२ लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले तसेच उर्वरित घरकुलांचे लाभार्थी ठरवून लवकरच वाटप करण्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Homework allocations to the slum beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.