नाशिक : सुमारे आठ ते दहा वर्षांपासून घरात धुणी-भांडीची कामे करणाऱ्या मोलकरणीने घरफोडीचा कट सराईत गुन्हेगारांकडून रचून यशस्वी केला; मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावून मोलकरणीसह तीच्या दोघा सराईत साथीदारांना गजाआड केले. त्यांच्याकडून सुमारे १४ लाख ५१ हजार रूपये किंमतीचे दागिने, महागड्या घड्याळ, रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.एन.डी.पटेल रोडवरील रहिवासी फिर्यादी प्रितलपालसिंग बलबीरसिंग बग्गा (४८,रा.चंदन बंगला) यांच्या इमारतीच्या दुसºया मजल्यावरील घरात टेरेसच्या दरवाजा तोडून प्रवेश करत बनावट किल्लीने मुख्य दरवाजाचे लॅच कुलूप उघडून संशयित महिला दिपाली बाळू साठे (३३,रा. पंचशीलनगर), जुनेद उर्फ राजू चांद शेख (३८,रा. पंचशीलनगर), सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी (२५,रा.भारतनगर, वडाळारोड) या तीघांनी बग्गा यांच्या घरातील सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, महागड्या घड्याळ असा सुमारे २६ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे, पोलीस निरिक्षक राकेश हांडे, उपनिरिक्षक जोनवाल, हवालदार शेरूखान पठाण, संतोष सानप यांनी गोपनीयरित्या तपासाला गती दिली. संशयावरून मोलकरीण साठे हिला सर्वप्रथम पोलिसांनी ताब्यात घेतले. तीची कसून चौकशी महिला पोलिसांमार्फत केली असता तीने तीच्या दोघा साथीदारांचे नावे उघड करत त्यांच्या मदतीने बग्गा यांच्या चंदन बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून पंचशीलनगर व भारतनगरमधून दोघा गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने या संशयित घरफोड्यांना येत्या गुरूवारपर्यंत पोलीस कोठही सुनावली.--मोलकरीणच ठरली मास्टरमाइंडचंदन बंगल्यात घरफोडी करण्यामध्ये या बंगल्यात मागील काही वर्षांपासून मोलकरीण म्हणून काम करणारी संशयित दिपाली ही मास्टरमाइंड ठरली. महिनाभरापुर्वी बग्गा यांच्या कपाटासह लॅच कुलूपाच्या किल्ल्या हरविल्या होत्या. यावळी दिपालीने त्या किल्ल्या सापडल्याचे सांगून परत केल्या; मात्र या दरम्यान तिने लॅचलॉकच्या किल्लीची बनावट किल्ली बनवून स्वत:जवळ ठेवली. जेव्हा बग्गा कुटुंबीय अमृतसरला निघून केले तेव्हा तिने घरफोडीचा रचलेला कट अंमलात आणला. लॅचलॉक मजबूत असल्याने ते तुटणार नाही, म्हणून बनावट किल्लीच्या सहाय्याने ते उघडून घरात प्रवेश करत ज्या कपाटात दागिने, रक्कम ठेवलेली आहे, केवळ तेच कपाट कटावणीच्या सहाय्याने चोरट्यांनी उचकटून सुमारे १८ लाख रूपयांना ‘चंदन’ लावले होते.
मोलकरणीने घरफोडीचा कट रचून १८ लाखांना लावले ‘चंदन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 17:01 IST
संशयावरून मोलकरीण साठे हिला सर्वप्रथम पोलिसांनी ताब्यात घेतले. तीची कसून चौकशी महिला पोलिसांमार्फत केली असता तीने तीच्या दोघा साथीदारांचे नावे उघड करत त्यांच्या मदतीने बग्गा यांच्या चंदन बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली.
मोलकरणीने घरफोडीचा कट रचून १८ लाखांना लावले ‘चंदन’
ठळक मुद्देमोलकरीणच ठरली मास्टरमाइंडलॅचलॉकच्या किल्लीची बनावट किल्ली बनवून स्वत:जवळ ठेवली