घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 15:50 IST2017-08-18T15:50:03+5:302017-08-18T15:50:36+5:30

घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास
नाशिक : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलइडी टीव्ही, लॅपटॉप व घड्याळ असा ५१ हजारांचा चोरून नेल्याची घटना महात्मानगर परिसरात घडली आहे़ जयंत भराडकर (रा. एवर स्माइल अपार्टमेंट, बंजारा हॉटेलच्या मागे, महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ ते १६ आॅगस्टदरम्यान ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील ३५ हजार रुपयांचा एलइडी टीव्ही, १५ हजार रुपयांचा लॅपटॉप, पंधराशे रुपयांचे घड्याळ चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.