घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:21 IST2017-08-21T17:12:40+5:302017-08-21T17:21:22+5:30

घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास
नाशिक : बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना म्हसरूळजवळील बोरगडमध्ये घडली़
रमेश बाळासाहेब कोटकर (फ्लॅट नंबर १२, विश्वेश्वर सोसायटी, पुष्पकनगर, अवतार पॉर्इंट, बोरगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार (दि़१९) रात्री साडेनऊ ते रविवारी (दि़२०) सकाळी साडेसात या वेळेत बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून एक लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला़ त्यामध्ये सोन्याचे सहा ग्रॅमचे कानातील टॉप्स, सात ग्रॅमचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅमचा सोन्याचा वेढा, ३५ हजार रुपयांची चांदीची ९०० ग्रॅम वीट, ३५ हजार रुपयांची रोकड, घड्याळ, पॅनकार्ड, मतदान कार्डाचा समावेश आहे़
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.