होमगार्डनी वाचविले महिलेचे प्राण
By Admin | Updated: March 28, 2015 00:35 IST2015-03-28T00:35:29+5:302015-03-28T00:35:54+5:30
होमगार्डनी वाचविले महिलेचे प्राण

होमगार्डनी वाचविले महिलेचे प्राण
पंचवटी : कौटुंबिक वादातून द्वारका काठेगल्ली परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय विवाहितेने तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलावरून उडी मारून आत्महत्त्येचा प्रयत्न करत असताना गृहरक्षक दलाच्या जवानांनी तत्परतेने तिचे प्राण वाचविले. पुलावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या या महिलेला ताब्यात घेऊन आडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, गृहरक्षक दलाचे गांधीनगर पथकातील कैलास बोधले, कल्पना पवार तसेच विशाल पवार अशा तिघांना तपोवन परिसरात पार्इंट ड्युटी असल्याने ते त्याठिकाणी थांबलेले होते. साधारणपणे दुपारी अडीच वाजेच्या सुमाराला त्या महिलेने पुलाकडे धाव घेतली व ती पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत आहे याबाबतची माहिती एका नागरिकाने होमगार्डसना दिली त्यानंतर त्या तिघाही होमगार्डसने तत्काळ पुलाकडे धाव घेऊन उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या महिलेला ताब्यात घेतले तिची माहिती घेत तिला आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. (वार्ताहर)