शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा बेघरांना घरपोच लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:28 IST

येवला तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचा लाभ बेघर लाभार्थींना घरी जाऊन थेट प्रशस्तिपत्र घरपोच देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देघरी जाऊन प्रशस्तिपत्र देण्याची पंचायत समितीची मोहीम

पंतप्रधान आवास योजनेचा घरकुलाचा लाभ लाभार्थी बेघरांना घरपोच थेट प्रशस्तिपत्र देताना पंचायत समितीच्या सभापती कविता आठशेरे. समवेत प्रवीण गायकवाड, गटविकास अधिकारी अन्सार शेख, विस्तार अधिकारी गायकवाड, आहेरवाडी सरपंच बबाबाई सोनवणे, भगवान जोरावर, मच्छिंद्र देवरे आदी.येवला : तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचा लाभ बेघर लाभार्थींना घरी जाऊन थेट प्रशस्तिपत्र घरपोच देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.येवला पंचायत समिती सभापती कविता आठशेरे व पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी थेट लाभार्थींची घरे गाठली. प्रत्येकाच्या झोपडीजवळ त्याला त्याच्या हक्काचे निवारा मंजुरी पत्र दिले. ते पत्र हातात पडल्याने लाभार्थींना मोठा आनंद झाला. यावेळी महादेववाडी, धामणगाव, आहेरवाडी या गावांना भेटी देऊन लाभार्थींना पत्र वाटप करण्यात आले. ग्रामसेवक यांच्याकडे लाभार्थीच्या करारपत्राचा नमुना देण्यात आला आहे.नव्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या व इतर लाभार्थींसाठी ६४९ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी येवला तालुक्यात ६४९ बेघरांना निवारा मिळणार असून, तालुकानिहाय व गावनिहाय उद्दिष्ट वाटप केले आहे.घरकुलाच्या लाभापासून वंचित असणाऱ्या लाभार्थींची यादी शासनाकडे मागणी पत्र पाठविले आहे. त्यात यावर्षी २२८ घरकुले रमाईमधून व पुढील वर्षी ३६० घरकुलांचे वैशिष्ट्य पंचायत समितीकडून शासनाला पाठविले आहे. येवला तसेच आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा करून आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचाही लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.९० व्या वर्षी घरकुलाचे स्वप्न साकारआहेरवाडी येथे ९० वर्षे झालेल्या आजींना घरकुल मंजुरीचे प्रशस्तिपत्र दिल्यानंतर त्यांना प्रचंड आनंद झाला होता. इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आजीला घरकुल मिळणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी अन्सार शेख, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गायकवाड, आहेरवाडी सरपंच बबाबाई सोनवणे, भगवान जोरावर, मच्छिंद्र देवरे, शिवाजी जाधव, बापू हंडोरे, सविता शेजवळ, प्रकाश सोनवणे, तुकाराम पैठणकर, शिवसेनेचे गटनेते दत्तू देवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHomeघर