भाजपाच्या लासलगाव शहराध्यक्षपदी होळकर
By Admin | Updated: November 24, 2015 23:31 IST2015-11-24T23:31:03+5:302015-11-24T23:31:36+5:30
भाजपाच्या लासलगाव शहराध्यक्षपदी होळकर

भाजपाच्या लासलगाव शहराध्यक्षपदी होळकर
लासलगाव : भारतीय जनता पार्टीच्या लासलगाव शहराध्यक्षपदी रवींद्र रामदास होळकर, तर उपाध्यक्षपदी संतोष सुदाम पवार यांची निवड करण्यात आली.
माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बापू पाटील यांनी रवींद्र होळकर यांची शहर अध्यक्षपदी, तर संतोष पवार यांची शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सुरेशबाबा पाटील, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शंकरराव वाघ, आमदार राहुल अहेर, डॉ. राजेंद्र फडके यांनी शुभेच्छा दिल्या.
या बैठकीला प्रकाश दायमा, जिल्हा सरचिटणीस कैलास सोनवणे, ओ.बी.सी. आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चाफेकर, तालुका सरचिटणीस मनोहर गायकवाड, दत्तुलाल शर्मा, मनोज भावसार, संपत नागरे, नितीन शर्मा, मयूर झांबरे, संतोष पलोड, राजूशेठ राणा, अमित बकरे, विनीत छाबडा, नीलेश सालकाडे, सचिन काळुंखे, उदय जाधव, सोनू आब्बड, गणेश जोशी, शशिकांत कारवाळ, पुरुषोत्तम कल्याणकर, समाधान मासुळे, शिवाजी काळे, मधुकर सरोदे, दीपक जगताप, सुभाष पवार, संदीप वाळके आदि उपस्थित होते. (वार्ताहर)