लासलगाव कृउबाचे होळकर शिवसेनेत
By Admin | Updated: January 13, 2017 00:48 IST2017-01-13T00:48:13+5:302017-01-13T00:48:25+5:30
लासलगाव कृउबाचे होळकर शिवसेनेत

लासलगाव कृउबाचे होळकर शिवसेनेत
निफाड : येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
निफाड येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जयदत्त होळकर, पंचायत समितीचे उपसभापती राहुल बनकर, जि. प. सदस्य कल्पना सूर्यवंशी यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्याप्रसंगी आयोजित मेळाव्याप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अनिल कदम होते. व्यासपीठावर ग्रामीण शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम गडाख, उपतालुकाप्रमुख साहेबराव पानगव्हाणे, बाळासाहेब क्षीरसागर, साहेबराव पारधे, भास्कर बनकर, उपसभापती राहुल बनकर, प्रकाश पाटिल, बाळासाहेब जगताप, राजाभाऊ दरेकर, सुभाष होळकर, प्रदीप आहिरे, सरपंच संदीप टर्ले उपस्थित होते. मंत्री भुसे म्हणाले, युतीचे गुऱ्हाळ चालूच राहील. आपण मात्र गाफील न राहता निवडणुकीच्या तयारीत राहावे. नव्या-जुन्या शिवसैनिकांचा सन्मान ठेवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता रांगेत उभी राहिली त्याचा त्रास सहन करावा लागला, असा आरोपही त्यांनी केला. आमदार अनिल कदम यांनी मनोगतात भाजपावर टीका केली. जयदत्त होळकर यांनी सेना प्रवेशाची भूमिका मांडली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, भास्करराव बनकर, बाळासाहेब क्षीरसागर, साहेबराव पानगव्हाणे, उत्तमराव गडाख यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर कराड यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)