रेल्वे अर्थसंकल्पाविरोधात तिकिटांची होळी

By Admin | Updated: July 10, 2014 01:04 IST2014-07-09T22:31:25+5:302014-07-10T01:04:49+5:30

रेल्वे अर्थसंकल्पाविरोधात तिकिटांची होळी

Holi tickets against railway budget | रेल्वे अर्थसंकल्पाविरोधात तिकिटांची होळी

रेल्वे अर्थसंकल्पाविरोधात तिकिटांची होळी

 

नाशिकरोड : केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात नाशिकसाठी कोणतीही नवीन गाडी मिळाली नसल्याने तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नवीन कामाची तरतूद न केल्याच्या निषेधार्थ नाशिक लोकसभा युवक कॉँग्रेसच्या वतीने रेल्वे तिकिटांची होळी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
गांधीगिरी मार्गाने रेल्वेस्थानक प्रबंधक एम. बी. सक्सेना यांचा सत्कार करून स्थानकाच्या बाहेर तिकिटांची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
रेल्वे अर्थसंकल्पात नाशिककरांबरोबरच महाराष्ट्राचीही निराशा केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नाशिकरोड रेल्वेस्थानक टर्मिनस व्हावे या मागणीकडे यंदाही दुर्लक्ष करण्यात आल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नाशिक लोकसभा युवक कॉँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राहुल दिवे, भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश पवार, जितेंद्र केदारे, दिलीप प्रधान, चंद्रशेखर पगारे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Holi tickets against railway budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.