शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत होलिकोत्सव साध्या पद्धतीने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 01:34 IST

होळी रे होळी पुरणाची पोळीऽऽ असा जयघोष करून मोजक्या महिला भगिनींनी फिजिकल डिस्टन्सिंग पालन करत पारंपरिक वेशभूषा करून होळीचे पूजन केले. रविवारच्या दिवशी सायंकाळी  हुताशनी पौर्णिमा होलिकोत्सव उत्साहात; पण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

पंचवटी : होळी रे होळी पुरणाची पोळीऽऽ असा जयघोष करून मोजक्या महिला भगिनींनी फिजिकल डिस्टन्सिंग पालन करत पारंपरिक वेशभूषा करून होळीचे पूजन केले. रविवारच्या दिवशी सायंकाळी  हुताशनी पौर्णिमा होलिकोत्सव उत्साहात; पण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पंचवटीत महिला युवतींनी होळीचे विधिवत पूजन केले. महिलांनी होळीभोवती शेणसडा करून रांगोळी काढली होती. रंगीबेरंगी हारडे चढवून हळद, कुंकू वाहून मुहूर्तावर  पूजन करत होळी पेटवून महिलांनी पुरणपोळी नैवेद्य दाखविला.  होलिकोत्सव साजरा करण्यासाठी मित्रमंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळ पासून तयारी केल्याचे दिसून आले. संध्याकाळी होळी जागा पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आली. त्याठिकाणी शेणसडा करत गोवऱ्या रचून रांगोळी काढण्यात आली. होळी पूजनानंतर श्रीफळ वाढवून गोवऱ्या-लाकडांची होळी पेटविली. हिरावाडी, गंगाघाट, गजानन चौक, जुना आडगाव नाका, गजानन चौक, पाथरवट लेन, सेवाकुंज, कृष्णनगर, सरदारचौक, शनिचौक, नवीन आडगाव नाका, काट्या मारुती चौक, तारवालानगर, नागचौक, बंजारमाता मंदिर, शिवाजी चौक, मालवीय चौक, म्हसरूळ, राममंदिर परिसर, त्रिमूर्तीनगर, कमलनगर, अयोध्यानगरी, आडगाव, आरटीओ, मेरी, दिंडोरीरोड, पेठरोड, मखमलाबाद, म्हसरूळ, नांदूर - मानूर, भागातील मित्रमंडळांनी होळी कोरोना नियम पालन करून साजरी केली.

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी