उन्हाळी सुटीसाठी ‘हॉलि-डे स्पेशल’

By Admin | Updated: May 6, 2016 00:19 IST2016-05-05T23:09:47+5:302016-05-06T00:19:01+5:30

विशेष गाड्या : जम्मू सुविधा स्पेशल दर शुक्रवारी

Holi-Day Special for summer holidays | उन्हाळी सुटीसाठी ‘हॉलि-डे स्पेशल’

उन्हाळी सुटीसाठी ‘हॉलि-डे स्पेशल’

नाशिकरोड : उन्हाळ्याच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ‘हॉली-डे स्पेशल’ रेल्वे सुरू केल्या आहेत.
उन्हाळी सुट्यांनिमित्त (गाडी क्र. ०२१७१) छत्रपती शिवाजी टर्मिनस ते जम्मूतावी ही जम्मू सुविधा स्पेशल रेल्वे शुक्रवारी सकाळी मुंबईहून सुटणार असून, ११ वाजता नाशिकहून जाणार आहे. (०४४१९) एलटीटी -निजामुद्दीन ही रेल्वे ११, १८, २५ मे व १ जून रोजी सकाळी ११ वाजता, संपूर्ण वातानुकूलित रेल्वे गाडी (०२१०७) एलटीटी-लखनौ ७, १४, २१, २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता, (०१०९३) एलटीटी ते हैदराबाद काझीपेठ व्हाया मनमाड ६, १३, २०, २७ मे रोजी दुपारी ३ वाजता, (०१०१७) एलटीटी-नागपूर व्हाया मनमाड ८, १५, २२, २९ मे व ५, १२, १९, २६ जून रोजी पहाटे ४.३० वाजता, (०२५११) पुणे-कामाख्या १२, १९, २६ मे व २, ९, १६, २३, ३० जून रोजी दुपारी ४.२० वाजता, (०१०२७) एलटीटी-मंडवाडीह १०, १७, २४, ३१ मे व ७, १४, २१, २८ जून रोजी दुपारी ४.२० वाजता, (०१०५५) सीएसटी ते बनारस ६, १०, १४, १८, २२, २६, ३० मे व ३, ७, ११, १५ जून रोजी पहाटे ३.२० वाजता, (०१०८१) दादर-भुसावळ ७, १४, २१, २८ मे, ४, ११, १८, २५ जून रोजी रात्री १२.५० वाजता व (०१०८७) एलटीटी-मंडवाडीह ६, १३, २०, २७ मे व ३ जून रोजी सायंकाळी ५.२० वाजता नाशिकरोड मार्गे जाणार आहे. तसेच या हॉली-डे स्पेशल रेल्वे पुन्हा मुंबईला त्याच मार्गे येण्यासाठीसुद्धा आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Holi-Day Special for summer holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.